Latest Posts

Read Latest Updates about our community

राष्ट्रासाठी, समाजासाठी, न्यायासाठी

वंदे मातरम् संघटना ही जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन भारतीयत्वाचा अभिमान जपणारी चळवळ आहे. आम्ही कोणत्याही विशिष्ट गटासाठी नव्हे, तर भारताच्या एकात्मतेसाठी, नागरिकांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी कार्यरत आहोत.

भारतातील वाढता भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार आणि समाजातील विसंगतींवर आम्ही लक्ष केंद्रित करतो. गरज असेल तेव्हा व्यापक रणनीतीने आणि गरज पडलीच तर आक्रमकतेने अन्यायाविरोधात लढतो.

आम्ही कोणत्या क्षेत्रात कार्य करतो?

✔ अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि भेदभावाविरोधात लढा
✔ सामाजिक परिवर्तनासाठी आणि राष्ट्रहितासाठी प्रबोधन व कृती
✔ शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक समरसता यासाठी उपक्रम
✔ सण आणि उत्सव नव्या स्वरूपात, समाजहिताच्या दृष्टीने साजरे करणे
✔ भारतीय संस्कृती आणि स्वाभिमान जोपासण्याचे कार्य

जातीयवादी, बलात्कारी आणि अत्याचाराविरोधात होळी दहन

• होळीच्या दिवशी समाजातील अन्याय, अत्याचार आणि शोषण याच्या प्रतिकात्मक दहनाने जनजागृती केली जाते.
•बलात्कार आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदे आणि त्यांची अंमलबजावणी कठोर व्हावी, यासाठी आम्ही आवाज उठवतो.
•सामाजिक सुधारणांसाठी आणि सुरक्षिततेसाठी व्यापक चर्चा आणि आंदोलन सुरू केले जाते.

देवदासी बहिणींसोबत रक्षाबंधन

• समाजाने बहिष्कृत केलेल्या देवदासी बहिणींना सन्मानाने जीवन जगता यावे, म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे.
•संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे करतात, त्यांना आधार देतात आणि त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करतात.

शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ २३ मार्च रोजी मशाल रॅली आणि ‘व्यर्थ ना हो बलिदान’ पुरस्कार

• देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मशाल रॅली काढली जाते.
•समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘व्यर्थ ना हो बलिदान’ पुरस्काराने गौरवण्यात येते.

तुम्हीही या चळवळीत सहभागी व्हा!

तुम्हालाही देशहितासाठी, समाजसुधारणेसाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी योगदान द्यायचे असेल, तर वंदे मातरम् संघटनेचा भाग बना!

एकत्र येऊ, संघर्ष करू आणि परिवर्तन घडवू!

पुस्तक दहीहंडी – ज्ञानाचा उत्सव!

• संपूर्ण देशात शैक्षणिक क्रांती घडवण्यासाठी ‘पुस्तक दहीहंडी’ ही आगळीवेगळी संकल्पना राबवली जाते.
•विद्यार्थी आणि तरुणांना विविध विषयांवरील पुस्तके मोफत वाटली जातात, वाचन संस्कृती वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात.
•समाजातील दानशूर व्यक्तींकडून पुस्तकांचे संकलन करून ती गरजू विद्यार्थ्यांना दिली जातात.

लाल चौक, श्रीनगर येथे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना

• काश्मीरमधील भारतीयत्व आणि हिंदू संस्कृतीचे अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी हा ऐतिहासिक उपक्रम केला जातो.
•लाल चौक येथे गणेशोत्सव साजरा करून ‘भारत अखंड आहे आणि अखंड राहील’ हा संदेश दिला जातो.

दिवाळीला सीमेवरील जवानांसाठी फराळ वाटप

• देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना साजऱ्या करणाऱ्या दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेतले जाते.
•स्वतः जाऊन किंवा टपालाद्वारे फराळ आणि शुभेच्छा पाठवून त्यांच्या कार्याचा सन्मान केला जातो.

Our Work

Read about our path-breaking work towards our community.

आमच्याविषयी

गुणवत्ता, व्यापकता आणि गरज पडली तर आक्रमकता सुद्धा!

🚩 १९८४ साली स्थापन झालेली वंदे मातरम् संघटना आज ४१ वर्षे पूर्ण करत आहे. या काळात आम्ही जात, धर्म, पंथ या भेदाभेदांच्या पलिकडे जाऊन समाजासाठी योगदान दिले आहे. आमच्या कार्याचा उद्देश भारतीयत्वाची ओळख प्रबळ करणे, राष्ट्रहितासाठी लढा देणे आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा आहे. ✨ आमच्या संघटनेची भूमिका
•समाजात राष्ट्रभक्तीची भावना प्रबळ करणे आणि भारतीयत्व जागरूक करणे
 
•भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराविरोधात ठाम भूमिका घेणे आणि उपाय शोधणे
•गरजू, अनाथ, महिला आणि वंचित घटकांसाठी सामाजिक उपक्रम राबवणे
•शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकल्प सुरू करणे
•देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याचा जागर समाजाला करून देणे
 
🌟 ४१ वर्षांचा वारसा – सण, उत्सव आणि परंपरा वेगळ्या पद्धतीने साजरे करण्याची संकल्पना. वंदे मातरम् संघटना सण आणि परंपरा केवळ कर्मकांड म्हणून साजरे करत नाही, तर त्यातून समाजहिताचा उद्देश पूर्ण करण्यावर भर देते. सणांचा अनावश्यक खर्च टाळून, त्याचा उपयोग देशभक्ती, सामाजिक कार्य आणि लोककल्याणासाठी केला जातो